Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

ज्ञानरचनावादअलीकडे ज्ञानरचनावाद   हा शब्द  शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्ञानरचनावाद एकदम आला कोठून ? इ . प्रश्न आपल्या  मनात येतात .राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF२००५) याचा तो पाया आहे ‘त्याच प्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीचा  शिक्षणाचा हक्क अधीनियम  2009 (RTE ) मधील कलम  २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये  त्याचा जास्तीत जास्त वापर  करणे  प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्त्यव्य आहे .
    
    आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत  असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .
    
   ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर आणि यांच्या विचारंशी  साम्य 
असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .
   
   ज्ञानरचनावादाची प्रस्तुती  वेगवेगळ्या शब्दात विविध तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही  विरोधाभास  आढळत नाही .त्या  सर्व तज्ञ्यांच्या विचार नुसार  ज्ञानरचना वादाची  काही प्रमुख  तत्वे  आपणास सांगता येतील .
. ज्ञान हे स्थिती शील static नसून गतिशील DYANAMIC आहे .
. मनुष्य स्वतः शिकत असतो ,आपल्या ज्ञानाची रचना करत असतो .
. पूर्वानुभवाच्या  आधारे  मनुष्य  ज्ञान रचना करतो .
 . सामाजिक , भाषिक व सांस्कृतिक आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते .
. स्थानिक  परिस्थितीचा / परिसराचा  मोठा वाट ज्ञान रचनेत असतो.
      
     ज्ञानरचानावादी  अध्ययन –अध्यापनासाठी  या  तत्त्वांचा समावेश वर्गातील  अध्यन –अध्यापन प्रक्रीये मध्ये करावा लागेल . त्यासाठी प्रथम आपण वर्गातील ज्ञानरचनावादी  अध्ययन- अधायापन   प्रक्रिया समजून घेऊ .

         
           ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन

 ज्ञानरचनावादी विचारसरणीनुसार नुसार शिकण्याची प्रक्रिया पुढील  तीन बाबीच्या  सम्यन्व्यातून घडून येते .

पूर्व ज्ञान
शिकवण्याची प्रक्रिया  हि सतत  चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार  या संज्ञेचा  अर्थ  बालक  विशिष्ट नवीन  घटक शिकण्यापूर्वी  त्या घटका संदर्भातील त्याची  आधीची
समज  असा घेता येईल . वर्गातील प्रक्रियेत  शिक्षकाला  मुलाच्या पूर्वज्ञानाचा  विचार करून  अध्ययन – अनुभवाची  निवड व रचना करावी लागेल .

शिकण्याची तयारी
       शिकणाऱ्यांची  शिकण्याची  तयारी करण्यासाठी त्याची  शिकण्याची इच्छा  व त्याची पात्रता  या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना  त्याची भावनिक अवस्था  कशा प्रकारची आहे  हेही  महत्त्वाचे ठरते .भावनिक स्थिरतेतून  भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी  बालकांची  मन: स्थिती  हि शिकण्यासाठी  योग्य  स्थिती असते .

अध्ययन  अनुभव
       बालकाला  ज्या अनुभावाद्वारे  नवीन ज्ञान प्राप्त  होणर असते तो अध्ययन-अनुभव ; म्हणजे  जो अनुभव  आजवर  त्याने घेतलेला नव्हता असा अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे .या अनुभावाद्वारे नविन माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही महत्त्व आहे .अध्ययन –अनुभव  जितके संख्येने  जास्त , विषयाला / आशयाला सुसंगत  व समर्पक तेवढा  अध्ययनाच्या प्रक्रियेत नेमकेपणा येतो .असे अध्ययन – अनुभव विचारपूर्वक  विद्यार्थांना पुरवणे हि जबाबदारी  शिक्षकाची आहे .
    अश्या  प्रकारे  विद्यार्थ्यांचे  पूर्वज्ञान ,त्यांची शिकण्याची तयारी  आणि अध्ययन –अनुभव यांचा  योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन –अध्यापन प्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेल. वर्गामध्ये शिक्षक  जे सांगतील  तसेच विध्यार्थी  करतात .शिक्षक  बोलतात तेच विध्यार्थी  ऐकतात .जोडवर्ग ,मोठे वर्ग , विषयांची  संख्या ,वेगवेगळया चाचण्या ,जोडीला एखादे  दुसरे अशैक्षणिक   काम या परिस्थितीमध्ये  वेळेत “पोर्शन “ संपवायची कसरत शिक्षक करत असतो . या प्रक्रियेत मुलांना  किती  समजले ,त्यांना काय वाटते , कोणती  गोष्ट त्यांना  कठीण जाते , त्यांना  काही अडले  आहे का,  यांसारख्या  गोष्टीना  वेळच मिळत नाही  किंवा दिला जात नाही . लहान मुले  उपजतच बहुविध  क्षमतेची  असतात . ती त्यांच्या  अंगभूत क्षमंतानुसार  व गतीनुसार शिकतात  आणि वेगवेगळ्या  पद्धतीने  ज्ञानाच उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्याला शिकवलेले हे  धडे  वर्गावर्गात  मात्र दूर्लक्षिले  जातात .शालामंध्ये  बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती ,फलक लेखन , पाठांतर ,सराव .गृहपाठ  या चाकोरीतून जाणे शिक्षकांना  व त्याची सवय झालेल्या विद्यार्थी, पालक , यांना सोयीचे जाते .अशा पदधतीने  अनेक वर्ष  शिक्षणाची प्रकिया  पार पडत आहे .परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात का? शिकत  नसतील ,तर तो विद्यार्थ्यांचा  क्षमतेचा ,बुद्धीचा  किवा शिक्षकांच्या  कौशल्याचा दोष मानला जातो , परंतु हे कितपत  खरे आहे ? दोष असेल  तर तो “शिकवणे “ या  पूर्वापार  चालत आलेल्या  संकल्पनेचा  दोष आहे ; हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच  आपण ‘शिकवणे  ‘ यावर  लक्ष  काढून घेऊन ते शिकणे  यावर केंद्रित  केले पाहिजे ,ज्ञानरचानावाद हि हेच सांगतो
ज्ञानरचनावाद ज्ञानरचनावाद Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.