Close X Home प्रश्न उत्तरे मराठी सुविचार इंग्रजी सुविचार मराठी बोधकथा इंग्रजी बोधकथा दिनविशेष बातमी पाठयपुस्तके विद्यार्थी गुणपत्रिका नोंदी वर्गवार विद्यार्थी नोंदी वर्ग 1 ते 8 शालेय अभिलेखे सेवापुस्तकातील नोंदी शालेय कामकाज महापुरुषांची माहिती विद्यार्थी लाभाच्या योजना शालेय कागदपत्रे शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड देशभक्तीपर गीते संचमान्यता नियमावली शिक्षकांनी ठेवावयाच्या नोंदी शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी आपली राष्ष्ट्रीय प्रतीके शालेय पोषण आहार विषयी परिपत्रके व शासन निर्णय मेडिकल बील डाउनलोड जात संवर्ग यादी म‍हत्‍वाची परिपत्रके व शासन निर्णय RTE अधिनियम 2009 मार्गदर्शिका शालेय पोषण आहार अभिलेखे बडबड गीते अर्जित रजा शासननिर्णय वरिष्ठ\निवड श्रेणी GR वैद्यकीय खर्च शासननिर्णय विज्ञानातील सोपे प्रयोग सातवा वेतन आयोगाच पगार चेक करा विविध शालेय स्पर्धा परीक्षा English table Reading The 12 Months and Week in English and List of Marathi Months पाढे ११ ते २० Table 11 to 20 अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा. PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोपी पद्धत मोबाईला बनवा माउस – विना इंटरनेट ONLINE TEST तयार करणे. प्रकल्प लेखन विविध प्रकारच्या प्रशिक्षणांची Online मागणी / नोंदणी , Online WE LEARN ENGLISH RTE कलमे ज्ञानरचनावाद प्रजासत्ताक दिन भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध भाषण – २६जानेवारी२०१९ गणित रोमन अंक महत्त्वाची संकेतस्थळे About Services Clients Contact

☰ अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

विज्ञानातील सोपे प्रयोग


विज्ञानातील सोपे प्रयोग


भाग १
खार्‍या पाण्याचे गोडे पाणी.
साहित्य – खारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी.कृती – एक परात घ्या. परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा. परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊन थांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपात सांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.पाण्याचीच वाफ होते, त्यातल्या क्षाराची होत नाही.
—–सूर्यफुलातल्या बियांची रचना.
साहित्य – सूर्यफूल, खडू.कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा. एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोडा. दुसर्‍या बीला लागून असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेल. अशा पद्धतीने सर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढा. आता दुसरी सर्वात आतली आणि खडूची खूण नसलेली बी शोधा. तिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढा. असे एकाच दिशेने जाणारे सर्व कंस काढा. मग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.५५    कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्ध दिशेचे येतात. या संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.
——रम्य गुणोत्तर
साहित्य – एक हात, पट्टी.कृती – आपल्याला हाताची लांबी मोजायची आहे. कोपरापासून मनगटापर्यंतची लांबी मोजा. नोंदवून ठेवा. (क). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा. नोदवून ठेवा. (ह). मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा, नोदवून ठेवा. (ब).  ह आणि क यांचे गुणोत्तर काढा. तसेच क आणि ब यांचे गुणोत्तर काढा. दोन्हीचे उत्तर सुमारे १.६१८ येते.या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतात. एका सरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचे गुणोत्तर, लहान खंड आणि मोठा खंड यांच्या गुणोत्तर इतके असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतात. आपला हात रम्य गुणोत्तरात असतो.
——बसल्या बसल्या वीज.
साहित्य – प्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठा तुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील. कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे प्रयेग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते. तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्ही विरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.
———अंगात वीज.
साहित्य – तुम्ही स्वत:कृती – तुमचा एक हात – डावखोर्‍यांनी उजवा आणि उजखोर्‍यांनी डावा – सरळ जमिनी समांतर ताणा. तो हात कोपर्‍यात दुमडा. दुसर्‍या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्‍याच्या हाडाच्या टोकावर हलका झटका द्या. तुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेल. यावरून तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.

हाताच्या कोपर्‍याच्या हाडांजवळील – अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असते. नसांचे कार्य विजेच्या सूक्ष्म प्रवाहावर अवलंबून असते. आपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तात सोडीयम जास्त असतो. त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.

———सूर्यावरचे डाग घरात पहा
साहित्य – आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील. आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.
——-संत्र्याची आतषबाजी
साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी, संत्रीकृती – संत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्ती काड्यापेटीने पेटवा. तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोट यांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेड पाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते. दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्या ज्योतिमुळे पेटतात व संपून विझतात.
————मऊ काजू करा टणक
साहित्य – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिजकृती – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे तेलबिया खायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवा. ती बशी फ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आत शिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेर फेकला जातो.
———आम्लतादर्शक पट्टी
साहित्य – साधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.कृती – साधा – गुळगुळीत नसलेला – वहीचा कागद घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद कडक होईपर्यंत वाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका. कोणता रंग येतो? अशाच दुसर्‍या तुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी तयार झाली. न झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्या अर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.
————हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.
साहित्य – मीठ, खाण्याचा सोडा, छोटा खलबत्ता, चमचा, आम्लतादर्शक पट्टी, अमोनिया.कृती – छोट्या खलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घाला, तसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला. बत्त्याने हे मिश्रण खलत रहा. आंबूस वास येईल. त्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेल. अमोनियाच्या द्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्या. तो खलाजवळ आणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेला दिसेल.मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो व खलात धुण्याचा सोडा तयार होतो. अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईड वायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.
विज्ञानातील सोपे प्रयोग विज्ञानातील सोपे प्रयोग Reviewed by Amol Uge on January 19, 2019 Rating: 5
Powered by Blogger.